स्व. रामचंद्र देशमुख
|| श्रद्धांजली व सेवाभाव ||

स्व. रामचंद्र देशमुख
फाउंडेशन

शिक्षण, सेवा व समाजकल्याणासाठी समर्पित

“ समाजाच्या प्रगतीसाठी, प्रत्येक हाताला मदतीचा हात ”

स्थापना : २०२४  •  बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी
आमची ओळख

आमच्याबद्दल

स्वर्गीय रामचंद्र देशमुख फाउंडेशन ही एक नि:स्वार्थीपणे, नफारहित तत्त्वावर चालणारी संस्था असून, शिक्षण, समाजसेवा व जनकल्याणासाठी समर्पित आहे.

समाजातील गरजू आणि वंचित घटकांपर्यंत मदत पोहोचवणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि मानवी मूल्यांचा प्रसार करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. स्व. रामचंद्र देशमुख यांच्या समाजसेवेच्या विचारांचा, संस्कारांचा व समर्पणाचा आदर्श घेऊन आम्ही समाजासाठी कार्यरत आहोत.

“ एक पाऊल समाजासाठी, एक वाट उज्ज्वल भविष्यासाठी ”

स्व. रामचंद्र देशमुख
आमचा पाया

ध्येय व दृष्टी

आमचे ध्येय

शिक्षणाचा प्रसार करणे, समाजातील गरजूंना मदत करणे आणि एक सशक्त, सुशिक्षित व संस्कारी समाज निर्माण करणे.

आमची दृष्टी

प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत, एक उज्ज्वल आणि आत्मनिर्भर समाज घडवणे.

आमचे कार्य

आमची कार्यक्षेत्रे

शिक्षण

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तकांचे वाटप, शैक्षणिक मार्गदर्शन व करिअर मार्गदर्शन उपक्रम.

समाजसेवा

गरजू लोकांना मदत, आरोग्य शिबिरे, वस्त्रदान, अन्नदान व इतर सामाजिक उपक्रम.

पर्यावरण संवर्धन

वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती व स्वच्छता अभियान.

संस्कार व मूल्य शिक्षण

विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, नैतिक मूल्ये व सामाजिक बांधिलकी निर्माण करणे.

आम्ही राबवत असलेले

आमचे उपक्रम

शैक्षणिक साहित्य वाटप

गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.

विद्यार्थी मदत उपक्रम

होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक सहाय्य.

वृक्षारोपण

पर्यावरण संवर्धनासाठी गावोगावी वृक्षारोपण मोहीम.

आरोग्य शिबिरे

ग्रामीण भागात मोफत आरोग्य तपासणी व वैद्यकीय शिबिरे.

वस्त्रदान

गरजू कुटुंबांना व नागरिकांना वस्त्रदान उपक्रम.

अन्नदान

गरजू व वंचित घटकांसाठी अन्नदान व भोजन सेवा.

“ ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे — शिक्षण, संस्कार आणि सेवेच्या माध्यमातून आम्ही समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत आहोत. ” — स्व. रामचंद्र देशमुख फाउंडेशन
आमच्याशी जोडले जा

संपर्क

संपर्क तपशील

पत्ता

मु. पो. बोरी , ता. जिंतूर, जि. परभणी – ४३१५०८, महाराष्ट्र

फोन

+91 81490 09393

ईमेल

swargiyaramchandrafoundation@gmail.com

सोशल मीडिया

/swaramchandradeshmukhfoundation

संदेश पाठवा